बदलीस पात्र शिक्षकांची व विस्थापित शिक्षकांची बदली | zpps tech guruji
Video Credit :- Anil Kamble Sir, Nanded
बदलीस पात्र शिक्षक :-
बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झलेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल.
४.५. टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती -
४.५.१. टप्पा क्र. १,२,३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल.
४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.
४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.
४.५.४ या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.
४.६ टप्पा क्र. ६ :- विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा :-
टप्पा क्र. ५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
वाचा - जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2021-22 पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6
❇️ जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली शासन निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये :-
1) बदल्या Online होणार.
2) शिक्षक बदलीपात्र होण्यासाठी सर्व साधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एका शाळेवर किमान पाच वर्षे सेवा.
3) बदली अधिकार प्राप्त शिक्षकासाठी अवघड भागात किमान तीन वर्षे सेवेची अट घालण्यात आलेली आहे.
4) खो देण्याची पध्दत बंद झालेली नाही.
5) बदलीपूर्वी बदली प्रक्रिया समजण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.
6) संवर्ग-1 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर संवर्ग-2 ची बदली प्रक्रिया राबविली जाईल.
7) याच प्रमाणे संवर्ग-1, संवर्ग-2, संवर्ग-3, संवर्ग-4 असा एक-एक टप्पा पूर्ण केला जाईल.
8) टप्याटप्याने फाॅर्म भरले जाणार असल्यामुळे Server वर लोड येणार नाही.
❇️ शिक्षकांच्या बदल्यांसाठी आवश्यक बाबी.
➡️ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.
➡️ जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर बदली प्रक्रियेशी संबंधित प्रशिक्षण.
➡️ शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे.
➡️ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे.
➡️ शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे.
____________________________
❇️ व्याख्या :-
➡️ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट-1 मध्ये नमूद असणार्या 7 बाबींपैकी किमान 3 बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/ शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल.
➡️ सर्वसाधारण क्षेत्र :- वरिल अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.
➡️ बदली वर्ष :- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.
➡️ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा :- अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत झालेली एकूण सलग सेवा.
➡️ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.
➡️ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.
➡️ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.
✳️ 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय पहा.👇
_______________________________
❇️7-एप्रिल-2021 जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली शासन निर्णय डाऊनलोड करा.⬇️👇
0 Comments