15 august swatantra din bhashan marathi | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
![]() |
15 august swatantra din bhashan marathi |
15 august swatantra din bhashan marathi, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हांला 15 ऑगस्ट बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे, ही माझी नम्र विनंती आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याअगोदर सुमारे दिडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. याकाळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले.
मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे ? इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा ? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे ? जिथे सोने उगवले जाते त्या आपल्या देशाची संपत्ती उघड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल !
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकरं तयार झाली. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला.
अशक्य कोटीतील लक्ष्य होते ! पण, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा, खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी ! या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला. सामर्थ्यवान इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढयात भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकावले. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्यांच्या लढयात उडी घेतली. चारही बाजुंनी इंग्रजांना घेरण्यात आले. आणि शेवटी तो सुवर्णदिन आला ! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे दीडशे वर्षाची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले होते. दीडशे वर्ष या भारतभूमीवर फडकणारा 'युनियन जॅक' खाली घेण्यात आला आणि 'तिरंगा' अभिमानाने फडकवण्यात आला.
0 Comments