स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi
![]() |
स्वातंत्र्य दिन निबंध मराठी |
स्वातंत्र्य दिन निबंध मराठी, swatantra din nibandh marathi
स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांच्या नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते.
आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि संपूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे. आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आपला राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.
भारतवर्षातील महान संविधानाचे लेखक बाबा साहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी संविधानात भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रेची ओळख करून दिली आहे तसेच त्यांना विशेष अधिकार देखील दिले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या समृद्धीच्या उंचीवर पोहोचला आहे.
आज संपूर्ण जगात भारत आशेची किरण बनूण सूर्यासम आकाशात चमकत आहे. पण आम्हाला हे स्वातंत्र्य सहजच मिळाले नाही, या साठी देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहेत. आपण त्यांंचे नेहमीच आभार मानायला हवेत.
आज आपण या स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे आपल्याला भारतमातेच्या वीर सपूतांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या स्वतःला पूर्णपणे या देशासाठी अर्पण केले होते. भारतातील प्रख्यात विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक उन्नती करून भारताच्या स्वातंत्र्यात चार पट वाढ केली.
आज भारत संपूर्ण जगात अविश्वसनीय आहे. सामाजिक कुरीती नाहिश्या झाल्यात, गरिबांचे आर्थिक शोषण संपले आणि खेड्यांच्या-गावांच्या स्थितीमध्ये देखील सुधारणा झाली.
आज भारतासमवेत संपूर्ण जग दहशतवाद्यांशी झुंज देत आहे. हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहे की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. काही लोकं दहशतवादाच्या नावाखाली अनेक निर्दोष लोकांना ठार मारतात, देशाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये सरकारी धोरण आणि देशाच्या संरक्षण यंत्रणेबद्दल संभ्रम निर्माण होतो. आपण सर्वांनी या दहशतवादाच्या विरुद्ध एकमताने आणि एकत्रितपणे मिळून सरकारला सहकार्य करायला हवे.
खरं तर हे आमचे सौभाग्याचं आहे की आम्ही या भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणे आवश्यक आहे. काही लोकं निव्वळ स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या देशाला भ्रष्टाचारात व्यापून देशातील भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. आपण एकत्र येऊन अश्या भ्रष्ट लोकांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि या भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन लवकरात लवकर केले पाहिजे.
भारतवर्षाला पूर्वी सारखे सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.
भारत मातेचा विजय असो, आम्ही सर्व एक आहोत, वंदे मातरम्.
0 Comments