Subscribe Us

महाराष्ट्र दिन भाषण | maharashtra din bhashan in marathi

महाराष्ट्र दिन भाषण | maharashtra din bhashan in marathi

महाराष्ट्र दिन भाषण | maharashtra din bhashan in marathi
महाराष्ट्र दिन भाषण | maharashtra din bhashan in marathi


महाराष्ट्र दिन भाषण

१ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा, हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा, कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखातून केले आहे. अशा या महाराष्ट्राच्या मातीत आणि संत, कलावंत, साहित्यिक, कलाकार, गायक, वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले. असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. ही आहे आपल्या महाराष्ट्राची शान. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्या दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात .

प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो. अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ ह्या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांसारखे अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले. या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे. अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे. आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे.

गेली कित्येक वर्ष जगाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या धडपडी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र. दगडांचा, मातीचा, डोंगरदऱ्यांच्या , विचारांचा, कलावंतांचा, बुद्धीवंतांचा, नानाविध कलाविष्कार यांचा, शास्त्रज्ञांचा, समाजसुधारकांचा आणि राजकारण्यांचा महाराष्ट्र. आज १ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापनादिन. स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काहींचा विरोध होता. यामुळे मराठी बांधवांनी चिडून याचा हर एक प्रकारे निषेध केला. प्रसंगी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या पुढे व मराठी माणसाच्या आंदोलनांमुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. मराठी भाषेला राजभाषेचा तर मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून दर्जा मिळाला. संत ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीचा बोलु कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन अशा शब्दात आपल्या मराठी भाषेची थोरवी गायिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हा आधुनिक भारताचे शिल्पकार यशवंतराव म्हणाले की, १ मे हा सोन्याचा दिवस, 1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस.

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने पुढाकार घेतला होता. महाराष्ट्राने आपली ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकर्तुत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत जन्मले आणि वाढले . त्यांनी संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची, विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्यांच्या विचारांवर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने ताठ उभा आहे . विदर्भ, कुंतल, अश्मक अशा विविध नावांचा मरहट्ट प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र.

वाचा👉 महाराष्ट्राचा राज्य माहिती मराठी

आपल्या देशासाठी प्राण पणास लावणारे अनेक रत्ने महाराष्ट्रात चमकली यामध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू, नाना पाटील अशा किती तरी देशभक्तांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. संत ज्ञानेश्वर यांच्या सारखे संत तर याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मीराबाई, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराजांच्या अश्या किती तरी संतांची मांदियाळी महाराष्ट्राच्या मानवी मनाला नवचेतना ऊर्जा देत गेली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज अशा अनेक समाज प्रबोधनकारांनी आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली. अनेक लेखकांनी तसेच अनेक कवींनी महाराष्ट्र मातीचा गोडवा गायला आहे .

कवी कुसुमाग्रजांनी मराठी मातीचे अवर्णनीय शब्दात वर्णन केले. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा. मराठी मातीत जन्माला आल्याचा, महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. 

वाचा 👉महाराष्ट्र दिन निबंध

पण खरेच महाराष्ट्र विकसित झाला आहे का ? विकासाची नक्की व्याख्या तरी काय ? गेल्या पन्नास वर्षात हळूहळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हे लक्षात घ्यायला हवे. साठ वर्षे होत आली तरी अजूनही मूलभूत प्रश्‍न तसेच आहेत. वीज भारनियमन आहे. सगळीकडे भ्रष्टाचाराचा राक्षस ही आहेच. सामान्य जनतेची होणारी फरफट आजही आहेच, राज्याची दयनीय अवस्था आहेच, रोज वर्तमानपत्रात कुठल्या ना कुठल्या शेतकर्‍याच्या आत्महत्येची बातमी असतेच, स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न ,बलात्कार, नैराश्य व्यसनाधीनता असे एक ना अनेक प्रश्न आजही समाजात सुरूच आहेत.

महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणार्‍या गोष्टीचा विचार करायला हवा. भ्रष्टाचार, गरिबी, मुलींवरचे अत्याचार या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे. पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन महाराष्ट्राची यशो गाथा ,महाराष्ट्राची शौर्य कथा ,पवित्र माती लावू कपाळी ,धरती मातेच्या चरणी माथा. जय महाराष्ट्र

वाचा 👉आंतरराष्ट्रीय कामगार दिन

वाचा 👉 UDISE PLUS माहिती कशी भरावी 

वाचा 👉Udise Plus माहिती भरण्याबाबत शाळास्तर,केंद्रस्तरावरील मार्गदर्शक सूचना  

वाचा 👉कोणत्याही शाळेचा Udise नंबर कसा शोधायचा  


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments