कोविड काळातील वर्णनात्मक नोंदी, आकारिक मूल्यमापन नोंदी pdf, akarik mulyamapan nondi
कोविड काळातील वर्णनात्मक नोंदी |
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारीक तंञे.👇
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
✳️ कोविड कालावधीतील करावयाच्या आकारिक नोंदी :-
(1) पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून आपल्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवतो.
(2) ऑनलाइन क्लासला उपस्थित असतो.
(3) बालदिन स्पर्धेत भाग घेतला आहे.
(4) चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे.
(5) कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबीयांना देतो.
(6) टिलि मिली कार्यक्रम बघतो.
(7) व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.
(8) विज्ञान विषयक नाविन्यपूर्ण प्रश्नांची उकल करतो.
(9) मास्कचा योग्य वापर करतो.
(10) स्वाध्याय सोडविण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीची मदत घेतो.
(11) स्वाध्याय पुस्तिकेतील अवघड प्रश्नाबाबत चर्चा करून उत्तरे लिहितो.
(12) स्वाध्याय पुस्तिका सोडवतो.
(13) विविध ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदवतो.
(14) स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवतो.
(15) यूट्यूब वरील शैक्षणिक व्हिडिओ पाहतो.
(16) ऑनलाइन चाचणी सोडवतो.
(17) गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टीची पीडीएफ आवडीने वाचतो व त्याखालील उपक्रमात सहभाग नोंदवतो.
(18) कोविड नियमांचे पालन करतो.
(19) पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरयुक्त शब्दांचा संग्रह करतो.
(20) ज्ञानरचनावादी वृत्ती दिसून येते.
(21) वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो.
(22) नियमित सूर्यनमस्कार व व्यायाम करतो.
(23) व्हाट्सअप वरील ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सहभागी होतो.
(24) पालकांच्या मदतीने शुद्धलेखनाचा भरपूर सराव करतो.
(25) नियमित शुद्धलेखन करतो.
(26) प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी साहित्याची सुयोग्य जमवाजमव करतो.
(27) कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडिओ बनवून पाठवतो.
(28) गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.
(29) पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा ॲप्स चा वापर नियमित करतो.
(30) दररोज दिलेला अभ्यास करतो.
(31) कल्पना चित्रांचे विवेचन करतो.
(32) स्वतःच्या आवडी निवडी बाबत स्पष्टता आढळते.
(33) स्वतः उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
(34) घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर करतो.
(35) घर परिसराची स्वच्छता ठेवतो.
(36) कोरोना विषयक नियमनासाठी इतरांना प्रेरीत करतो.
(37) युट्युब वरील अध्यापन घटकाचे अवलोकन करतो व कार्यात तत्परता व कृतिशीलता जाणवते.
(38) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
(39) स्वयंअध्ययन वर लक्ष केंद्रित करतो.
(40) मोकळ्या वेळेचा सदुपयोग करतो.
आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - भाषा
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधारणा आवश्यक
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विशेष प्रगती आवड व छंद
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments